श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी , बी.पी.एड विभाग आयोजित क्रीडा उद्बोधन शिबीर अहवाल. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी पी एड विभागाने आज दिनांक 30/07/2025 रोजी कर्मवीर विद्यालय चारे या शाळेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडेचे उद्बोधन व्हावे यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले. बार्शी ते चारे बस प्रवास. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी.पी. एड भाग दोन मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी आज दिनांक 30/07/2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वा. प्रत्यक्ष बसणे प्रवासाला सुरुवात केली आणि 10:25 मी कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी पोहोचलो. आगमन झाल्यावर एकत्रिकरण बी.पी.एड च्या मार्गदर्शिका डॉक्टर एस एस सुरवसे मॅडम यांनी सर्व बी.पी. एड च्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित रित्या हाजरी व मार्गदर्शन केले. तसेच बी. पी.एड विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए.जी कांबळे सर यांनी कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य यांची ओळख करून दिली, व शिबिर घेण्यास मान्यता दिली. व तसेच शुभेच्छा देखील दिले. मैदान आखणी बीपीएडच्या स...