शालेय आंतरवासिता व क्रीडा उद्बोधन शिबिर

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी. पी. एड विभागाचा शालेय आंतरवासीता व क्रीडा उद्बोधन शिबिर अहवाल.
 कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी. पी. एड  विभागाने आज दिनांक 05/08/2025 रोजी लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आगळगाव या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडेचे उद्बोधन व्हावे यासाठी एक दिवशीय क्रीडा उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बार्शी ते आगळगाव बस प्रवास.
 कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी भाग दोन मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी आज दिनांक 05/08/2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वा. प्रत्यक्ष बसणे प्रवासाला सुरुवात केली आणि  9:30 मी. लोकसेवा विद्यालय आगळगाव या ठिकाणी पोहोचलो.
 आगमन झाल्यावर एकत्रीकरण 
बी. पी एड. च्या मार्गदर्शिका डॉ.एस एस सुरवसे मॅडम यांनी सर्व बी.पी.एड च्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रितरित्या हजेरी व मार्गदर्शन केले. व हजेरी झाल्यानंतर  बी.पी.एड विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर. ए.जी कांबळे सर यांनी देखील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले व सूचना देऊन शुभेच्छा दिल्या.
 मैदान आखणी 
 बी.पी.एड.च्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दोरी,टेप,फक्की, इत्यादी साहित्यांच्या  आधारे कबड्डी,खो-खो,गोळा फेक, थाळीफेक,बास्केटबॉल, फुटबॉल, हॉलीबॉल, सॉफ्ट बॉल, 100 मीटर रनिंग,इत्यादी खेळांच्या मैदानाची आखणी केली.
 शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत झाल्यावर स्वागत 
 प्रत्येक शाळेच्या दिवसाची सुरुवात हीं प्रार्थनेने होते 
 व त्याचप्रमाणे राष्ट्रगीत प्रतिज्ञा व प्रार्थना इत्यादींचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे बीपीएड विभागाचे सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व बी.पी.एड विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर. ए.जी कांबळे सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. व इतर शिक्षकांचे देखील स्वागत करण्यात आले.
 उपस्थित शिक्षक 
1.डॉ. ए.जी कांबळे सर बी.पी.एड विभाग प्रमुख 
 2.डॉ एस.एस सुरवसे मॅडम 
3. सहा. प्रा. पी. पी नरळे सर 
4. डॉ. एस. एस. मारकड सर 
5.सहा. प्रा. एस. ए. सावळे सर 

 व त्याच प्रमाणे बी.पी.एड विभागातील प्रशिक्षणार्थी शुभम घोलप यांचा वाढदिवस असल्याने शाळेतील नियमानुसार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 पाठ व  उद्बोधनास सुरुवात 
 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्ग मैदानावर आणले व विद्यार्थ्यांना मैदान आखणी कशी करतात हे सांगितले .
 साहित्याची ओळख व त्याचप्रमाणे विविध खेळातील कौशल्य शिकवण्यात आले.
 जसं की बास्केटबॉल मधील चेस्ट पास,फुटबॉल मधील पुश पास,सॉफ्टबॉल मधील पिचिंग,व्हॉलीबॉल मधील अंडर आर्म सर्विस कराटे मधील फेसपंच, फ्रंट किक हे कौशल्य शिकवण्यात आले.

 दुपारचे भोजन 
 शालेय व्यवस्थापन समितीने जेवणाचे नियोजन उत्तमरीत्या केले होते जेवण खूप स्वादिष्ट व उत्तम असे होते. व बी.पी.एड चे सर्व शिक्षक व विभागाचे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी खूप छान जेवणाचा आस्वाद घेतला.
 पाठ व उद्बोधन कार्य 
 पूर्ण मैदानावर मैदान आखणी  केली होती जसे की खो-खो,कबड्डी,हॉलीबॉल ,फुटबॉल,100 मीटर रनिंग,सॉफ्ट बॉल, गोळा फेक,भालाफेक,थाळीफेक व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खेळाची माहिती देऊन त्यांच्याकडून कृती करून घेण्यात आली.

 सामूहिक प्रात्यक्षिके 
 सामूहिक प्रात्यक्षिकाच्या वेळी शाळेतील सर्व मुली व मुले तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका यांचे मैदानावर एकत्रीकरण करण्यात आले.
 कराटे बद्दल माहिती सांगून प्रत्येकाच्या स्वरक्षणासाठी कराटे हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे याचे महत्त्व सांगितले गेले. सर्वांना व सगळ्यासमोर उभे राहून प्रात्यक्षिक बी.पी. एड विभागाचे प्रशिक्षणार्थी 
1. अनिकेत गोडसे 
2.विक्रांत गोंड
3.स्वामिनी डोळसे 
4.दिपाली  मदने 
 या प्रशिक्षणार्थ्यांनी करून दाखवले.
 त्यामध्ये काही पंच व किक शिकवण्यात आले.
 जसं की फ्रंट किक इनसाईड केक आऊटसाईड किक, फेस पंच,मिडल पंच शिकवले गेले व विद्यार्थ्यांनी खूप मनापासून प्रतिसाद दिला व शिकले देखील.
 याचवेळी सर्व प्रात्यक्षिक करून झाल्यावर शाळेतील मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थिनी पूर्ण दिवसभरातील खेळातील प्रत्येक कौशल्य कसे शिकवण्यात आले याचे निरीक्षण करून आदर्श कोल्हे व श्रावणी आगळे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
 त्याचप्रमाणे बीपीएड विभागाच्या मार्गदर्शक शिक्षिका डॉक्टर.एस. एस सुरवसे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून बी. पी.एड विभागाद्वारे शाळा व शाळा प्रशासनाचे आभार मानले. व त्याचप्रमाणे बीपीएड प्रशिक्षणार्थी सनी जाधव व ऋतुजा पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 आगळगाव येथून बार्शी चा परतीचा प्रवास 
 कार्यक्रम झाल्यानंतर बी पी एड  विभागाचे सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी मैदानावरती एकत्रित झाले व काही सूचना सांगण्यात आल्या त्याचप्रमाणे दिवसभरातील कामाचे कौतुक करण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले प्रशिक्षणार्थ्यांनी सूचनांचे पालन केले व पूर्ण ग्रुप चा एक ग्रुप फोटो काढण्यात आला.
 व नंतर परतीचा प्रवास सुरू झाला व काही वेळाने सगळ्यांचे बार्शीत आगमन झाले.


Popular posts from this blog

एक दिवशीय क्रीडा उद्बोधन शिबिर......