एक दिवशीय क्रीडा उद्बोधन शिबिर......

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी , बी.पी.एड विभाग आयोजित क्रीडा उद्बोधन शिबीर अहवाल.
 कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी पी एड विभागाने आज दिनांक 30/07/2025 रोजी कर्मवीर विद्यालय चारे या शाळेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडेचे उद्बोधन  व्हावे यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले.
बार्शी ते चारे बस प्रवास.
 कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी.पी. एड भाग दोन मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी आज दिनांक 30/07/2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वा. प्रत्यक्ष बसणे प्रवासाला सुरुवात केली आणि 10:25 मी कर्मवीर विद्यालय चारे  या ठिकाणी पोहोचलो.
 आगमन झाल्यावर एकत्रिकरण
 बी.पी.एड च्या  मार्गदर्शिका डॉक्टर एस एस सुरवसे मॅडम यांनी सर्व बी.पी. एड च्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित रित्या हाजरी व मार्गदर्शन केले. तसेच बी. पी.एड विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए.जी कांबळे सर यांनी कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य यांची ओळख करून दिली, व शिबिर घेण्यास मान्यता दिली. व तसेच शुभेच्छा देखील दिले.

 मैदान आखणी 
 बीपीएडच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दोरी टेप फक्की इत्यादी साहित्याच्या आधारे कबड्डी,खो-खो,गोळा फेक, थाळीफेक,बास्केटबॉल, फुटबॉल,हॉलीबॉल,इत्यादी. खेळांच्या मैदानाची आखणी केली.
 शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत झाल्यावर स्वागत 
 प्रत्येक शाळेच्या दिवसाची सुरुवात हीं प्रार्थनेने होते 
 व त्याचप्रमाणे राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना व महाराष्ट्र गीत इत्यादींचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे बी.पी.एड विभागाचे सर्व शिक्षकांचे व प्रशिक्षणार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले, व सत्कार करण्यात आला.
 सत्कार मूर्ती  सर्व शिक्षक 
1.डॉ.ए.जी.कांबळे सर बी. पी. एड विभाग प्रमुख
2. डॉ.एस. एस. सुरवसे मॅडम
3. सहा.पी.पी नरळे सर 
4. एस.एस सुरवसे मॅडम 
5. डॉ.एस.एस मारकड सर 
6. सहा. प्रा.एस.ए सावळे सर.
 या सर्वांचा टाळ्यांच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
 पाठ व उद्बोधनास सुरुवात 
 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्ग मैदानावर आणले व  विद्यार्थ्यांना मैदानाचे आखणी कशी करतात हे सांगितले साहित्याची ओळख व त्याचप्रमाणे विविध खेळातील कौशल्य शिकवण्यात आले.
 जसं की बास्केटबॉल मधील चेस्ट पास हे कौशल्य शिकवले. व तसेच फुटबॉल मधील पुश पास हे कौशल्य शिकवले.

 दुपारचे भोजन 
 शाळेतील व्यवस्थापन समितीने जेवणाचे नियोजन उत्तमरीत्या केले होते जेवण खूप स्वादिष्ट व उत्तम असे होते व बी. पी एड चे  सर्व शिक्षक व विभागाचे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी  खूप छान जेवणाचा आस्वाद घेतला.
 पाठ व उद्बोधन कार्य 
 पूर्ण मैदानावर मैदान आखणी केली होती. जसे की   खो-खो,कबड्डी,हॉलीबॉल,फुटबॉल, व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खेळाची माहिती देऊन त्यांच्याकडून कृती करून घेण्यात आली.
 सामूहिक प्रात्यक्षिके 
 सामूहिक प्रात्यक्षिकाच्या वेळी शाळेतील सर्व मुली व मुले तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका यांचे मैदानावर एकत्रिकरण करण्यात आले.
 कराटे बद्दल माहिती सांगून प्रत्येकाच्या स्वरक्षणासाठी कराटे हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे याचे महत्त्व सांगितले गेले.
 सर्वांना व सगळ्यासमोर उभे राहून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बीपीएड विभागाचे प्रशिक्षणार्थी अनिकेत गोडसेस्वामिनी डोळसे यांनी करून दाखविले.
 त्यामध्ये काही पंच व किक्स व ब्लॉक शिकवण्यात आले. जसे की फ्रंट की साईड किक  स्नॅप किक इनसाईड किक आऊटसाईड किक, फेस पंच शिकवले गेले व विद्यार्थ्यांनी खूप मनापासून प्रतिसाद दिला व शिकले देखील.
 याचवेळी सर्व प्रात्यक्षिक करून झाल्यावर शाळेतील प्राचार्य चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त केले व त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थिनी पूर्ण दिवसभरातील खेळातील प्रत्येक कौशल्य कसे शिकवण्यात आले याचे निरीक्षण करून त्यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले त्या सर्वांना हे एक दिवशीय क्रीडा उद्बोधन शिबिर खूप मनापासून आवडले. नंदिनी जाधव, गायत्री काळे व कृष्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
 त्याचप्रमाणे बि.पि.एड विभागाच्या मार्गदर्शक शिक्षिका डॉक्टर एस.एस.सुरवसे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून बी. पी. एड विभागाद्वारे शाळा व शाळा प्रशासनाचे आभार मानले. व त्याचप्रमाणे बीपीड प्रशिक्षणार्थी निखिल कुरडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले शाळा व शाळेची शिस्त खूप चांगल्या प्रकारचे आहे असे सांगितले.
 चारे येथून बार्शी चा परतीचा प्रवास 
 कार्यक्रम झाल्यानंतर बीपीड विभागाचे सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी मैदानावरती एकत्रित झाले व काही सूचना सांगण्यात आल्या त्याचप्रमाणे दिवसभरातील कामाचे कौतुक करण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले . प्रशिक्षणार्थ्यांनी सूचनांचे पालन केले.
 त्याचप्रमाणे पूर्ण ग्रुपचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला. व नंतर परतीचा प्रवास सुरू झाला व काही वेळाने सगळ्यांचे बार्शीत आगमन झाले..
🙏!!!धन्यवाद!!!!🙏

Popular posts from this blog

शालेय आंतरवासिता व क्रीडा उद्बोधन शिबिर