शालेय आंतरवासिता व क्रीडा उद्बोधन शिबिर
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी. पी. एड विभागाचा शालेय आंतरवासीता व क्रीडा उद्बोधन शिबिर अहवाल. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी बी. पी. एड विभागाने आज दिनांक 05/08/2025 रोजी लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आगळगाव या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडेचे उद्बोधन व्हावे यासाठी एक दिवशीय क्रीडा उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बार्शी ते आगळगाव बस प्रवास. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी भाग दोन मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी आज दिनांक 05/08/2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वा. प्रत्यक्ष बसणे प्रवासाला सुरुवात केली आणि 9:30 मी. लोकसेवा विद्यालय आगळगाव या ठिकाणी पोहोचलो. आगमन झाल्यावर एकत्रीकरण बी. पी एड. च्या मार्गदर्शिका डॉ.एस एस सुरवसे मॅडम यांनी सर्व बी.पी.एड च्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रितरित्या हजेरी व मार्गदर्शन केले. व हजेरी झाल्यानंतर बी.पी.एड विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर. ए.जी कांबळे सर यांनी देखील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले व सूचना देऊन शुभेच्छा दिल्या. ...